कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झुकरबर्ग इंस्टाग्राम-व्हॉट्सअॅप विकू शकतात

06:19 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेत अँटीट्रस्ट खटल्याची सुनावणी, चौकशीसाठी बोलावले जाणार

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म- फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाला त्यांचे दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकावे लागू शकतात. कारण वॉशिंग्टन, यूएसए येथे कंपनीविरुद्ध अँटीट्रस्ट खटल्याची सुनावणी आहे. अमेरिकेतील स्पर्धा आणि ग्राहक वॉचडॉगने कंपनीवर आरोप केला आहे की त्यांनी 2012 मध्ये इंस्टाग्राम (1 अब्ज) आणि 2014 मध्ये व्हॉट्सअॅप (22 अब्ज) खरेदी करून बाजारातील स्पर्धा संपवण्यासाठी मत्तेदारी निर्माण केली.

एफटीसीने प्लॅटफॉर्म विकण्यासाठी केस जिंकली

फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) ने व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम खरेदी करण्याची ही परवानगी दिली. परंतु नियमांनुसार, एफटीसीला कराराच्या निकालावरही लक्ष ठेवावे लागले. म्हणून त्यांना मेटावर खटला दाखल करावा लागला. जर (एफटीसी) केस जिंकली तर ते मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप दोन्ही विकण्यास भाग पाडू शकते.

झुकरबर्ग आणि माजी सीओओ यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. अहवालानुसार, या प्रकरणात सुनावणीदरम्यान झुकरबर्ग आणि कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) शेरिल सँडबर्ग दोघांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

झुकरबर्गविरुद्ध युक्तिवाद...

व्हँडरबिल्ट लॉ स्कूलमधील अँटी ट्रस्टच्या प्राध्यापिका रेबेका होवे अॅलेन्सवर्थ म्हणाल्या की झुकरबर्गने इन्स्टाग्रामवरील स्पर्धा निष्प्रभ करण्यासाठी फेसबुक खरेदी केले. झुकरबर्गचे संभाषण आणि ईमेल खटल्यात सर्वात ठोस पुरावे देऊ शकतात. झुकरबर्ग म्हणाले की बाजारात स्पर्धा करण्यापेक्षा ती कंपनी खरेदी करणे चांगले.

मार्क झुकरबर्गचा युक्तिवाद...

मेटाने असा युक्तिवाद केला की ते केस जिंकतील कारण इंस्टाग्राम खरेदी केल्यानंतर त्यांचा वापरकर्ता अनुभव सुधारला. अहवालानूसार, मेटा असा युक्तिवाद करू शकते की, अँटी ट्रस्ट प्रकरणात हेतू फारसा संबंधित नाही.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article