For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्या नडेला यांच्याकडून एआय क्रिकेट अॅपची निर्मिती

06:46 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
सत्या नडेला यांच्याकडून एआय क्रिकेट अॅपची निर्मिती
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी क्रिकेट आणि तंत्रज्ञानावरील प्रेमातून स्वत:चे एआय-आधारित क्रिकेट विश्लेषण अॅप तयार केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी या अॅपचा वापर करून भारतीय कसोटी सामने खेळणाऱ्या इलेव्हनची निवडही केली आहे. या अॅपने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू विराट कोहली आणि एस. धोनी यांच्या कर्णधारपदावरही आपले मत व्यक्त केले. टेक दिग्गज सत्या नडेला यांनी क्रिकेटला डेटा गेममध्ये रूपांतरित केले आहे.

 काय आहे डीप रिसर्च एआय क्रिकेट अॅप?

Advertisement

सत्या नाडेला यांनी 11 डिसेंबर 2025 रोजी बेंगळुरू येथे एका डेव्हलपर कार्यक्रमात या डीप रिसर्च एआय क्रिकेट अॅपची घोषणा केली. जे त्यांनी त्यांच्या काळात बनवले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी अॅपचा लाईव्ह डेमो देखील दिला. त्यांनी थँक्सगिव्हिंग सुट्टीच्या काळात अॅप तयार केले होते. डीप रिसर्च एआय असे नाव देण्यात आले. ते एआय आणि कोडिंगद्वारे क्रिकेटवरील त्यांच्या प्रेमाचे उत्तरांमध्ये रूपांतर करत आहेत. या अॅपद्वारे भारतीय कसोटी सामने खेळणाऱ्या इलेव्हनची निवड केली. या अॅपच्या लाईव्ह डेमो दरम्यान, मायक्रोसॉफ्टच्या सीईओनी स्पष्ट केले की वेगवेगळे एआय एजंट निवड समिती म्हणून कसे काम करत आहेत, ते केवळ त्यांच्या आवडत्या संघातील खेळाडूंची निवड करत नाहीत तर त्यांच्याबद्दल त्यांचे मत देखील देतात.

Advertisement
Tags :

.