For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जलजीवनचे काम करण्यासाठी ठेकदारांना विरोध; जिह्यातील काही गावांत कामे रखडलेलीच

11:34 AM Dec 04, 2023 IST | Abhijeet Khandekar
जलजीवनचे काम करण्यासाठी ठेकदारांना विरोध  जिह्यातील काही गावांत कामे रखडलेलीच
ZP kolhapur Jaljivan Yojna
Advertisement

जि.प.प्रशासनाने वाद मिटवण्याची गरज ;943 योजनांचे काम प्रगतीपथावर; 262 योजनांचे काम पूर्ण

कृष्णात चौगले कोल्हापूर

जिह्यातील काही गावांत ‘जलजीवन’ योजनेचे काम ज्या ठेकेदाराने घेतले आहे, त्याला काम करण्यासाठी स्थानिक पातळीवरून विरोध केला जात आहे. संबंधित ठेकेदाराने यापूर्वी केलेल्या निकृष्ठ दर्जांच्या कामांचा अनुभव आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम करण्याची पद्धत यामुळे त्या गावातून विरोध होत आहे. परिणामी तेथील योजनांचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींकडून जिल्हा परिषदेच्या सीईओंसह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन दुसरा ठेकेदार देण्याची मागणी देखील केली आहे. पण जि.प.प्रशासनाने त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

Advertisement

जिह्यात अशा प्रकारे किती योजनांचे काम रखडले आहे ? याचा आढावा घेऊन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने वाद मिटवणे आवश्यक आहे. अन्यथा अशा वादग्रस्त योजनांचे काम रखडलेल्या अवस्थेतच राहण्याची शक्यता आहे. जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून कार्यवाही सुरू आहे. प्रत्येक गावांत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निरिक्षणाखाली कामे सुरळीतपणे सुरू आहेत. जिह्यात एकूण 1205 नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे केली जाणार असून त्याला तांत्रिक, प्रशासकीय मान्यतेसह वर्कऑर्डर देखील दिली आहे. त्यापैकी 943 योजनांची कामे प्रगतीपथावर असून 262 योजना पूर्ण झाल्या आहेत.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून सन 2019 पासून जल जीवन ा†मशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुऊ करण्यात आलेला आहे. ‘हर घर नल से जल’ या घोषवाक्यानुसार या प्रकल्पांतर्गत सन 2024 पर्यंत प्रती व्य‹ाr प्रती ा†दन 55 ा†लटर प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला नळाव्दारे शुध्द व सुरा†क्षत पाणी पुरवठा करणेचे उद्दीष्ट आहे. पुढील 30 वर्षातील लोकसंख्या विचारात घेऊन ही योजना गतिमान पद्धतीने राबविली जात आहे. कोल्हापूर ा†जह्यात ‘जल जीवन ा†मशन’चे काम वेगाने सुरू असून एकूण 1205 योजनांचा समावेश आहे.

Advertisement

जलजीवन मिशन योजनेतील कामांची स्थिती
तालुका            मंजूर कामे         प्रगतीपथावर असलेली कामे                   पूर्ण झालेली कामे
आजरा            84                           77                                                  07
भुदरगड         104                         88                                                   16
चंदगड     168 149 19
गडहिंग्लज 108 87 21
गगनबावडा 41 38 03
हातकणंगले 67 37 30
कागल 98 69 29
करवीर 119 96 23
पन्हाळा 116 78 38
राधानगरी 109 90 19
शाहूवाडी 138 91 47
शिरोळ 53 43 10
एकूण 1205 943 262

Advertisement
Tags :

.