For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तपासनाक्याला जि. पं. सीईओंची भेट

10:49 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
तपासनाक्याला जि  पं  सीईओंची भेट
Advertisement

नियमांचे उल्लंघन न करण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : अथणी तालुक्यातील तेलसंगजवळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या तपासनाक्याला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. चिकोडी लोकसभा मतदार संघाचे ते निवडणूक अधिकारी आहेत. या आपल्या भेटीदरम्यान तपासनाक्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची व्यवस्थितपणे तपासणी करावी. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना राहुल शिंदे यांनी केली. अथणी येथील तहसीलदार कार्यालयात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर लिडकर कॉलनी परिसरातील घराघरांना भेटी देऊन प्रत्येकाने मतदान करावे. मतदान करणे हे सक्तीचे आहे, असे सांगत यासंबंधी जागृती केली. हल्याळ व नागनूर पी. के. येथील बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनेच्या जॅकवेलला भेट देऊन पाहणी केली. हल्याळपासून र•sरट्टीपर्यंतच्या रस्ताकामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद कल्लापुरे, तहसीलदार वाणी, पंचायत राज अभियांत्रिकी विभागाचे वीरण्णा वाली, साहाय्यक निवडणूक अधिकारी एच. मल्लिकार्जुन, मेहबूब कोतवाल, जी. एस. मठद आदी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.