महाराणी चषकासाठी झोया काझीची निवड
11:08 AM Aug 01, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित महाराणी चषक महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगावच्या झोया इम्तियाज काझीची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. महाराजा चषक ही पुरुषांची टी-20 क्रिकेट स्पर्धा असून महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महाराणी चषक ही महिलांसाठी टी-20 स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. महाराणी क्रिकेट स्पर्धेत पाच संघ सहभागी आहेत. झोया मंगळूर ड्रॅगर्न्स संघाचे प्रतिनिधीत्व करणार असून या स्पर्धेत हुबळी टायगर्स, शिमोगा लायन्स, मंगळूर ड्रॅगन्स व बंगळूर ब्लास्टर्स या संघाचा सहभाग आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article