झोरावर सिंग संधूला सातवे स्थान
वृत्तसंस्था/ दोहा
पुरुषांच्या ट्रॅप फायनलमध्ये पहिल्या 10 लक्ष्यांमध्ये सात हिट्ससह झोरावर सिंग संधू सातव्या स्थानावर राहिला. सोमवारी येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक फायनलमध्ये भारताने दोन सुवर्णांसह सहा पदके पटकावत आपल्या मोहिमेचा शेवट केला.
लुसैल शूटिंग कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या शॉटगन स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेता झोरावर हा एकमेव भारतीय प्रतिनिधी होता. आयएसएसएफच्या नवीन नियमांनुसार आता आठ नेमबाजांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत झोरावरने प्रवेश केला. पात्रता फेरीत त्याने 119 गुण मिळवए सहावे स्थान मिळवले. 30 शॉटच्या अंतिम फेरीत तो योगय कामगिरी करू शकला नाही आणि इटालियन जियोव्हानी पेलीलोसह तो पहिल्या दोघांमध्ये बाद झाला.
चीनने भारतापुढे चार सुवर्ण आणि नऊ पदकांसह अव्वल स्थान पटकावले. त्या दिवशी पुरुषांच्या ट्रॅप आणि स्कीटमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकणारी अमेरिका तिसऱ्या स्थानावर राहिली. भारताच्या मोहिमेतील सर्वोच्च गुणांमध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये सिमरनप्रीत कौर ब्रारने मिळविलेले आश्चर्यकारक सुवर्ण आणि महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी सुरुची फोगट यांचा समावेश होता.
आयएसएसएफ विश्वचषक फायनलमध्ये भारताने पहिल्यांदाच डबल पोडियम फिनिशिंगची नोंद केली, जेव्हा सैन्यमने भारतासाठी मोहिमेतील तीन रौप्य पदकांपैकी पहिले रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड-फायर पिस्तूलमध्ये अनिश भानवाला हे रौप्यपदक विजेते होते. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये विद्यमान विश्वविजेत्या सम्राट राणा याने भारताचे एकमेव कांस्यपदक जिंकले