'झोमॅटोच्या सीईओ'ने मागितली माफी
व्हेज-मोड फी आकारल्याबद्दल सोशल मिडीयावर केली पोस्ट
'झोमॅटो'चे सीईओ, दिपींदर गोयल यांनी सर्व ग्राहकांची जाहीर माफी मागितली आहे. ते म्हणाले, आमच्याकडून मूर्खपणा झाला. मला माफ करा. मला खूप वाईट वाटत आहे. आणि शाकाहारी डिलिव्हरीसाठी ग्राहकांकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचेही आश्वासन दिले आहे.
झोमॅटो या अॅप्लिकेशनवर व्हेज फूड ऑर्डर केल्याबद्दल व्हेज मोड फी अशी अतिरिक्त आकारण्यात येत होती. याबद्दल एका लिंक्ढइन वापरकर्त्याने शाकाहारी डिलीव्हरीसाठी जास्त पैसे द्यावे लागत आहे, अशी तक्रार केली. त्यानंतर या तक्रारचे निराकरण करत झोमॅटेच्या सीईओनी सर्व ग्राहकांची जाहीर माफी मागितली. आणि त्वरीत ही चूक लक्षात आणून त्यामध्ये दुरुस्ती केली.
रूट टू मार्केटींग ई-कॉमर्सचे सहाय्यक उपाध्यक्ष रोहित रंजन यांनी "भारतात आजकाल शाकाहारी असणे हे चूक असल्यासारखे वाटते. झोमॅटोच्या नवीन मास्टरस्ट्रोकने - व्हेज मोड सक्षमीकरणासाठी "अतिरिक्त शुल्क" सुरू केल्याने - आम्हाला अधिकृतपणे प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये रूपांतरित केले आहे. तर, शाकाहारी मित्रांनो, स्वतःला तयार करा! आम्ही "हिरवे आणि निरोगी" पासून "हिरवे आणि महाग" झालो आहोत. झोमॅटो, पुन्हा एकदा शाकाहारी असणं हा एक लक्झरी कर आहे हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद," अशी पोस्ट करत झोमॅटोच्या या व्हेज मोड बद्दल लिंक्ड्ढीनवर तक्रार केली होती.
त्यांच्या या पोस्टकडे झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांचे लक्ष वेधले. त्यावरत्यांनी लगेचच माफी मागितली आणि सुधारणाही केली.
त्यांच्या या उत्तरावर रोहित रंजन यांनीही प्रतिउत्तर दिले की, "पुन्हा एकदा हस्तक्षेप करून आम्हाला वाचवल्याबद्दल धन्यवाद! या प्रवासात मला खरोखर आश्चर्य वाटले ते म्हणजे ही कल्पना, पहिल्या टप्प्यापासून अंमलबजावणीपर्यंत यशस्वीरित्या नेणे आणि वरिष्ठ भागधारकांची मान्यता मिळवणे."
या संभाषणावर अनेक वापरकर्त्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तर अनेक वापरकर्ते ही संभाषण वाचून स्वतःचे मनोरंजनही करत आहेत.