झिंका लॉजिस्टिक्सचे समभाग 280.90 टक्क्यांवर सूचीबद्ध
वृत्तसंस्था/ मुंबई
झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड यांचे समभाग राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये 2.89 टक्क्यांसोबत 280.90 वर सुचीबद्ध झाले आहेत. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये समभागांची किंमत 2.22 टक्क्यांवर जात 279.05 टक्क्यांवर सूचीबद्द झले आहेत. आयपीओची इश्यू किंमत 273 प्रति समभाग राहिली होती. दरम्यान हा आयपीओ 13 ते 18 नोव्हेंबर पर्यंत बोली लावण्यासाठी आयपीओ खुला होता. पूर्ण आयपीओ 1.87 पटीने सब्सक्राइब झाला होता. रिटेल वर्गवारीत 1.70 पट झाला. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये 0.24 पट सब्सक्राइब झाले.
झिंका लॉजिस्टिक सोल्युशन्स लिमिटेडने त्यांच्या सार्वजनिक इश्यूसाठी प्रति शेअर रु 259-273 किंमत बँड सेट केला होता. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 54 शेअर्ससाठी बोली लावू शकत होते. तुम्ही घ्झ्ध् च्या रु. 273 च्या वरच्या प्राइस बँडवर 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, यासाठी रु. 14,742 गुंतवावे लागणार होते.
त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 14 लॉटसाठी म्हणजेच 756 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. यासाठी, गुंतवणूकदारांना वरच्या किंमतीच्या बँडनुसार 206,388 रुपये गुंतवावे लागले. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10% हिस्सा राखीव होता.