होंडाने ‘सीआरएफ 1100 अफ्रिका ट्विन’ परत मागविल्या
इंजिनमधील बिघाडामुळे कंपनीचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) यांनी दिलेल्या माहितीनुसार थ्रॉटल ऑपरेशन (इंजिन) च्या संबंधीत बिघाड झाल्यामुळे कंपनीने सीआरएफ1100 अफ्रीका ट्विन च्या काही मोटरसायकली परत मागविल्या आहेत.दुचाकी वाहन निर्माण करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे की , इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या कारणास्तव जागतिक बाजाराच्या नियमावलीनुसार दुचाकी परत मागविण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान कंपनीने म्हटले आहे की, फेब्रुवारी 2022 आणि ऑक्टोबर 2022 च्या दरम्यान सीआरएफ1100 अफ्रीका ट्विन च्या काही दुचाकींना बिघाड निर्माण झाल्याच्या कारणांस्तव कंपनीने या गाड्या परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. एचएमएसआयने म्हटले आहे की, काही सुधारणात्मक उपायासोबत होंडाच्या प्रभावीत असणाऱ्या दुचाकींमध्ये ईसीयू सॉफ्टवेअरला योग्य प्रोगॅमिंगसोबत अपडेट करण्यात येणार आहे. तसेच सर्व बिघाड झालेल्या दुचाकींची दुरूस्ती ही विनाशूल्क करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने यावेळी दिले आहे.