झिम्बाब्वेचा 586 धावांचा डोंगर
विलियम्स, एर्व्हिन, बेनेट यांची दमदार शतके
वृत्तसंस्था / बुलावायो
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी यजमान झिम्बाब्वेने अफगाण विरुद्ध पहिल्या डावात 586 धावांचा डोंगर उभा केला. झिम्बाब्वेच्या डावात सिन विलियम्स, कर्णधार एर्व्हिन आणि बेनेट यांनी दमदार शतके झळकविली.
झिम्बाब्वे संघाने 4 बाद 363 या धावसंख्येवरुन शुक्रवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. दरम्यान, त्यांचा डाव 135.2 षटकात 586 धावांवर चहापनापूर्वीच संपुष्टात आला. झिम्बाब्वेच्या डावात सिन विलियम्सने 174 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 154, कर्णधार एर्व्हिनने 176 चेंडूत 10 चौकारांसह 104, तर बेनेटने 124 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 110 तसेच बेन क्युरेनने 74 चेंडूत 11 चौकारांसह 68, कैतानोने 115 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 46, मेयर्सने 3 चौकारांसह 27, नेमहुरीने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, मुझारबनीने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 19 धावा जमविल्या. अफगाणतर्फे गझनफरने 127 धावांत 3 तर नावेद झेद्रान, झहीर खान आणि झिया ऊर रेहमान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ओमरझाईने 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक: झिम्बाब्वे प. डाव 135.2 षटकात सर्वबाद 586 (विलियम्स 154, एर्व्हिन 104, बेनेट नाबाद 110, क्युरेन 68, कैतानो 46, मेयर्स 27, न्यामहुरी 26, मुझारबनीने 19, अवांतर 20, गझनफर 3-127, झहीर खान, झेद्रान, झिया ऊर रेहमान प्रत्येकी 2 बळी, ओमरझाई 1-66)