For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिम्बाब्वेचा पाकवर 2 गड्यांनी निसटता विजय

06:18 AM Dec 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
झिम्बाब्वेचा पाकवर 2 गड्यांनी निसटता विजय
Advertisement

पाकचा मालिका विजय, बेनेट ‘सामनावीर’, सुफीयान मुकीम ‘मालिकावीर’

Advertisement

वृत्तसंस्था / बुलावायो

तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील गुरुवारी खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात ‘सामनावीर’ ग्रायन बेनेटच्या समयोचित फलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वेने  पाकचा एक चेंडू बाकी ठेवून 2 गड्यांनी पराभव केला. पण पाकने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. पाकच्या सुफीयान मुकीमला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 132 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेने 19.5 षटकात 8 बाद 133 धावा जमवित आपला विजय नोंदविताना पाकला या मालिकेत एकतर्फी विजयापासून रोखले.

पाकच्या डावामध्ये कर्णधार सलमान आगाने 32 चेंडूत 3 चौकारांसह 32, तयाब ताहीरने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21, अक्रमने 15 चेंडूत 3 चौकारांसह 20, अराफत मीनहासने 2 चौकारांसह नाबाद 22, अब्बास आफ्रिदीने 3 चौकारांसह 15 आणि जहाँदाद खानने 1 षटकारासह नाबाद 6 धावा केल्या. पाकच्या डावामध्ये 2 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात पाकने 42 धावा जमविताना 3 गडी गमविले. पाकचे अर्धशतक 46 चेंडूत, शतक 101 चेंडूत फलकावर लागले. झिम्बाब्वेतर्फे मुझारबनीने 25 धावांत 2 तर मासाकेझा, निग्रेव्हा, मेपोसा आणि ब्युरेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या डावात सलामीच्या ब्रायन बेनेटने 35 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 43, मेरुमनीने 6 चेंडूत 3 चौकारांसह 15, मेअर्सने 18 चेंडूत 13, कर्णधार सिकंदर रझाने 20 चेंडूत 1 चौकारासह 19, मधबेरेने  1 चौकारासह 7, मेपोसाने 4 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 12 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या डावात 2 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे जहाँदाद खानने 30 धावांत 2 तर अब्बास आफ्रिदीने 24 धावांत 3, सलमान आगा आणि मुकीम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. झिम्बाब्वेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 56 धावांत 1 गडी गमविला. झिम्बाब्वेचे अर्धशतक 30 चेंडूत तर शतक 99 चेंडूत फलकावर लागले.

संक्षिप्त धावफलक: पाक 20 षटकात 7 बाद 132 (सलमान आगा 32, ताहीर 21, अक्रम 20, मीनहास नाबाद 22, अब्बास आफ्रिदी 15, अवांतर 7 मुझारबनी 2-25, मासाकेझा, निग्रेव्हा, मेपोसा, ब्युरेल प्रत्येकी 1 बळी), झिम्बाब्वे 19.5 षटकात 8 बाद 133 (बेनेट 43, मेरुमनी 15, मेअर्स 13, सिकंदर रझा 19, मेपोसा नाबाद 12, अवांतर 4, अब्बास आफ्रिदी 3-24, जहाँदाद खान 2-30, सलमान आगा आणि मुकीम प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.