जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
सातारा :
सातारा जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत बावधनकर वय 45 वर्ग 3 राहणार सहकारी गृहनिर्माण संस्था सोनगाव सातारा यांना 24 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा विभागाने सापळा रचून पकडले .कॉलिटी कंट्रोल रिपोर्ट देण्यासाठी चार हजार रुपये आणि इस्टिमेटच्या पाच टक्के असे 24 हजाराची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले आहे .
बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली .तक्रारदार हे जिल्हा परिषद सातारा बांधकाम विभागांमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता व कंत्राटदार स्थापत्य विभागाचे परवाना प्राप्त कंत्राटदार आहेत .त्यांना मौजे पार्ले तालुका कराड येथील रस्त्याचे काँक्रीट करण्याचे काम 2024 मध्ये मिळाले होते .
कंत्राटदारांनी वर्क ऑर्डर प्रमाणे हे काम पूर्ण केले कामाचे मोजमाप करून बिल काढण्यासाठी त्यांनी आरोपी लोकसेवक प्रशांत बावधनकर यांच्या कार्यालयात भेट घेतली बावधनकर यांनी वर्क ऑर्डर चे काम आणि त्याचा कॉलिटी कंट्रोल रिपोर्ट यासाठी 24 हजार रुपयांची मागणी केली यामध्ये 20 हजार रुपये इस्टिमेटचे आणि चार हजार रुपये व्यक्तिगत असे 24 हजार रुपये ची मागणी केली होती .
तक्रारदारांनी याबाबत सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे गणेश ताटे निलेश राजपुरे निलेश चव्हाण अजयराव देशमुख राजेंद्र निकम यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचला आणि पंचांसमक्ष 24 हजार रुपयाची लाज घेताना रंगेहाथ पकडले त्यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती .