Satara News : साताऱ्यात अनोखी मैत्री! अवलिया आणि ‘उंदीर मामा’ची भन्नाट साथ सोशल मीडियावर व्हायरल”
साताऱ्यात अवलिया व उंदीर मामा यांची विलक्षण जोडी
सातारा : “जगात कोण कोणाचा मित्र होईल हे सांगता येत नाही… पण साताऱ्यात एका अवलियाचा मित्र चक्क उंदीर मामा आहे! आणि ही विलक्षण मैत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.”अवलिया आणि उंदीर मामा “हा अवलिया साताऱ्यातील रस्त्यांवर फिरताना दिसतो…आणि त्याचा जिवलग मित्र उंदीर मामा रोज त्याच्या खांद्यावर बसून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ… शांतपणे पोटी तृप्ती देणारी ‘पेटपूजा’ करतो. परिसरातील नागरिक सांगतात हा उंदीर त्याच्याशी जणू माणसासारख्याच गप्पा मारतो!”
“विशेष म्हणजे, हाच व्यक्ती कालच साताऱ्यात ग्रेट सेपरेटरच्या मध्यभागी अपघातात सापडला. मोठा अनर्थ टळला… पण त्याचा पाय जखमी झाला आहे.” “‘रहने को घर नही… सोने को बिस्तर नही… अपना खुदा है रखवाला…’ जमिनीला अंथरूण आणि आकाशाला पांघरूण मानून जगणाऱ्या या अवलियाला आज एकच सोबती—आणि तो म्हणजे उंदीर मामा!”
“या अनोख्या मैत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर साताऱ्यात जोरदार व्हायरल झाला आहे. माणसामाणसात मैत्री तुटत असताना… या अनोख्या मैत्रीने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.”