कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli : जिल्हा परिषदेची अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबरला

02:21 PM Oct 30, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                   सांगली जिल्ह्यात अंतिम मतदार यादीची प्रतीक्षा वाढली

Advertisement

सांगली : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची प्रारुप मतदार यादी जाहीर करून आक्षेप मागविले होते. तसेच आक्षेप निकाली काढून २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. दुबार नावे वगळण्याची कार्यवाही पूर्ण करून तीन नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

Advertisement

जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि पंचायत समितीचे १२२ गण आहेत. जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आतापर्यंत गट, गणाची रचना, जिल्हा परिषदआरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली. प्रारुप मतदार यादीही प्रसिद्ध केली. नगरपरिषदांच्या प्रारुप मतदार यादीत मोठा घोळ झाला. त्यामुळेच १७ हजारांवर आक्षेप दाखल झाले. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या प्रारुप मतदार यादीवर नाममात्र आक्षेप होते.

आक्षेप निकाली काढून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २७ऑक्टोंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादीसंबंधी सुधारित आदेश काढून मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील गोंधळून गेले आहेत. जिल्हा परिषदेच्या ६१ गटातील मतदार यादीच्या प्रारूपावर आक्षेप सुनावगी झाली आहे. रविवारी अंतिम यादी येणार होती, मात्र आता तीन नोव्हेंबरपर्यंतची मुदत वाढविली आहे.

तीन नोव्हेंबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रामाणित करून त्या करून त्या माहितीसाठी ठेवण्यात येत असल्याची सूचना प्रसिद्ध करावी. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची याची व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करावी, असे आदेश आयोगाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम एक आठवडा लांबणीवर गेला आहे.

Advertisement
Tags :
#panchayatsamiti#sanglinews#sangliupdates#VoterListUpdatemaharashtrapoliticssangli-zp-voter-list-delayed
Next Article