Solapur : कुर्डुवाडी मतदान केंद्राजवळ पोलिसांशी धक्काबुक्की; तिघांवर गुन्हा दाखल
कुर्डुवाडीमध्ये पोलिसांशी हुज्जत
कुर्डुवाडी : कुर्डुवाडी येथील सेंट अन्थोनी प्रायमरी स्कूल रेल्वे हॉस्पिटलमागे असलेल्या मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात बंदोबस्त करताना तीन व्यक्तींनी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी, शिवीगाळ व धमकी दिली. तसेच मतदारांना मशाल चिन्हाला मतदान करण्यासाठी प्रचार केला. या घटनेवरून कुर्जुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ओंकार गव्हाणे, पवन कोळी व भैय्या श्रीरामे (सर्व रा. कुर्जुवाडी, ता. माढा) यांच्यावर कारवाई झाली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल पंजाब सुर्वे यांनी फिर्याद दिली असून २ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता ही घटना घडली. पोलिसांनी शासकीय कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद केले आहे. मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने सतर्कता वाढवली व रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.