महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झेवर गॅलरी, रॉजर्स किंग्ज उपांत्य फेरीत

09:51 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विश्रुत  चिट्स चषक क्रिकेट स्पर्धेत

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत  चिट्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात झेवर गॅलरी डायमंड व रॉजर्स सुपर किंग्स यांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना साई फार्म स्पोर्ट्सने 22.1 षटकात सर्व गडी बाद 89 धावा केल्या. साईराज पोरवाल चार चौकारांसह 23 सार्थक मुऊडकर 3 चौकारासह 15 धावा केल्या. रॉजर्स संघातर्फे विवान भूसद 16 धावात 4 साईराज चव्हाण, अथर्व बेळगावकर व विश्रुत कुंदरनाड प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरा दाखल रॉजर्स सुपर किंग्स संघाने 14.3 षटकात 2 गडी बाद 93 धावा जमवत हा सामना  जिंकला. कर्णधार अवनीश हट्टीकर 11 चौकारांसह नाबाद  61 धावा केल्या. रजत शंभूचे 2 चौकारासह 14 धावा केल्या. साई फार्म तर्फे अथर्व करडीने 2 गडी बाद केले. सामनावीर अवनीश हट्टीकर व इम्पॅक्ट खेळाडू विवान भूसद यांना प्रमुख पाहुण्या दीपा देसुरकर, दीपा खांडेकर, मंजुळा कोटी, माधुरी चौगुले यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झेवर गॅलरी डायमंड संघाने 25 षटकात 4 गडी बाद 287 धावा केल्या.  अजय लमानीने चौफेर टोलेबाजी करताना 21 चौकारांसह 112 केल्या. मोहम्मद हमझाने 7 चौकारांसह 65 तर लक्ष खातायत 8 चौकार 38, आऊष पुत्रनने 4 चौकारांसह 24 धावा केल्या. रॉयल तर्फे नुमान व फराज याने प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तर दाखल रॉयल संघ 25 षटकात 7 गडी बाद 99 धावा केल्या. अमोघ हिरेमठ 10 चौकारांसह 44, निखिल आडके 16 धावा केल्या. झेवर गॅलरी तर्फे अवनीश बसुर्तेकर , मोहम्मद हमजा यांनी प्रत्येकी 3 तर लक्ष खातायतने एक गडी बाद केला. सामनावीर मोहम्मद हमजा इम्पॅक्ट खेळाडू अजय लमानी यांना प्रमुख पाहुणे आशिष चव्हाण किशन सिद्धलिंग मिथिलेश मेंडके रवी गोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आजचे सामने - सकाळी 9.30 वा. झेवर गॅलरी व साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर दुपारी 1.30 वा. रॉजर्स व केआर शेट्टी किंग्स यांच्यात उपांत्य सामने होणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article