कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘झेप्टो’ने आयपीओपूर्वीच मूळ कंपनीचे नाव बदलले

07:00 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

किराणाकार्ट टेक्नॉलॉजीजचे आता झेप्टो प्रायव्हेट लिमिटेड नाव

Advertisement

नवी दिल्ली : इन्स्टंट किराणा डिलिव्हरी अॅप झेप्टोने आयपीओ बाजारात आणण्यापूर्वीच आपल्या मूळ कंपनीचे नाव बदलले आहे. एका अहवालानुसार सध्या कंपनीचे अधिकृत नाव ‘झेप्टो प्रायव्हेट लिमिटेड’ झाले आहे, जे पूर्वी ‘किराणाकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ होते. कंपनीचे नाव बदलण्याची मंजुरी मुंबईतील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी)कडून मिळाली आहे. ब्रँड ओळख अधिक मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जेणेकरुन गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये हे नाव सहज लक्षात राहते. प्राप्त वृत्तानुसार कंपनी या वर्षाच्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला आपला आयपीओ सादर करु शकते. मागील काही महिन्यांमध्ये झेप्टोने एकूण 11,558 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला आहे. कंपनीने जून 2024 मध्ये सुमारे 5,700 कोटी उभारले असून आणखी 2,500 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनी बनवत आहे.

Advertisement

झेप्टोची सुरुवात

भारतातील किराणा मालाच्या डिलिव्हरी क्षेत्रात झेप्टो ही एक जलद वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बेंगळुरात आहे. 2021 मध्ये आदित पालिचा व कैवल्य वोहरा यांनी झेप्टोची स्थापना केली. अल्पावधीतच कंपनीच्या कामाला यश आले आणि ऑगस्ट 2024 पर्यंत कंपनीचे मूल्य 5 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होते. 2021 मध्ये, कंपनीने झेप्टो असे नाव बदलले आणि ऑर्डर पूर्ण करण्यासाठी डार्क स्टोअर्सचे नेटवर्क तयार केले. मोठ्या 10 शहरांमध्ये कंपनीची 250 हून अधिक डार्क स्टोअर्स आहेत. एप्रिल 2022 मध्ये, झेप्टोने कॅफे लाँच केले, जो कॉफी आणि तयार अन्नाच्या डिलिव्हरीवर लक्ष केंद्रित करणारा विभाग होता. झेप्टोच्या स्पर्धकांमध्ये अमेझॉनचे इंडिया युनिट, फ्लिपकार्ट, स्विगी इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि बिगबास्केट यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article