For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झेलेंस्कींच्या सर्वात शक्तिशाली सहकाऱ्याचा राजीनामा

06:52 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
झेलेंस्कींच्या सर्वात शक्तिशाली सहकाऱ्याचा राजीनामा
Advertisement

वृत्तसंस्था/ कीव्ह

Advertisement

युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांचे चीफ ऑफ स्टाफ एंड्री यरमक यांनी राजीनामा दिला आहे. भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांनी घरी छापा टाकल्यावर त्यांना स्वत:च्या पदावरून हटावे लागले. हे पूर्ण प्रकरण 100 दशलक्ष डॉलर्सच्या किकबॅक घोटाळ्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

एंड्री यरमक हे युक्रेनचे दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जात होते आणि रशियाच्या आक्रमणादरम्यान कूटनीति आणि शांतता चर्चांचे ते प्रमुख चेहरे होते. त्यांनी विदेशी संपर्काचे व्यवस्थापन पेले आणि कीव्हच्या दौऱ्यावर येणाऱ्या नेत्यांचे स्वागत केले होते. याचबरोबर सैन्य तसेच राजनयिक समर्थनासाठी अध्यक्षांसोबत ते आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्येही सामील झाले होते. यरमक यांनी रशियासोबत कैद्यांची अदलाबदली तसेच अमेरिकेसोबतचा संपर्क सांभाळला होता.  नॅशनल अँटी करप्शन ब्युरोने काही दिवसांपूर्वी ऊर्जा क्षेत्रातील घोटाळ्याच्या तपासाप्रकरणी यरमक यांच्या घराची झडती घेतली होती. याप्रकरणी दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर यरमक यांनाही पद सोडावे लागले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.