रिव्हर्स गियरमध्ये ‘वारा’, हिमयुगासारखा धोका
सध्या पूर्ण जगातील हवामान बदललेले आहे. अनेक ठिकाणी ज्वालामुखी विस्फोट होत आहेत. कधी चक्रीवादळामुळे पूर येतोय, तर कुठे उष्णतेचा प्रकोप दिसून येतोय. अत्यंत अधिक हवामान बदल एकत्रित यापूर्वी कधीच पाहिले गेले नव्हते. वेगवेगळ्या घटना असल्या तरीही सर्व परस्परांशी कुठे ना कुठे जोडलेल्या आहेत. याचा प्रभाव जगावर पडत आहे. यंदा टोकाच्या हवामान आपत्ती आल्या असून पुढीलवर्षीही धोका आहे.
हवामान तज्ञांनुसार हे क्यूबीडी (क्वासी-बायनेनियल ऑसल्लेशन कॉलॅप्स)चे तुटणे किंवा कोसळणे आहे. म्हणजेच पृथ्वीपासून 20-30 किलोमीटवर वर वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह पलटला आहे. हे सर्वसाधारणपणे 28-30 महिन्यांमध्ये दिशा बदलत होती. हा प्रवाह नोव्हेंबरमध्येच पलटला आहे. तर हे काम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये व्हायचे.
ही छोटी घटना नाही, यामुळे पूर्ण पृथ्वीचे हवामान बदलते. हवामानाचे मशीन सध्या हादरले आहे. म्हणजेच हवामान संचालित करणाऱ्या इंजिनने रिव्हर्स गियर टाकला आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाच्या एनओएएच्या आकडेवारीनुसार वारे पश्चिमेपासून पूर्व दिशेने उलट्या दिशेने वाहत आहेत. हा प्रकार सामान्य तुलनेत 2-3 महिन्यांपूर्वी घडला आहे. खासकरून यामुळे ला नीना प्रभावित होईल, जे नोव्हेंबर 2025 पासून फेब्रुवारी 2026 पर्यंत राहणार आहे. क्यूबीओ तुटल्याने वादळं अनियमित होतात, आर्द्रता असामान्य ठिकाणांवर कमी होते. टोकाच्या हवामान घटना (म्हणजेच पूर, दुष्काळ, उष्णतेची लाट) क्लस्टरमध्ये येतात. भारतात याचा प्रभाव थेट आणि खोल असेल. कारण आम्ही हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरादरम्यान स्थित आहोत.
सध्या जगात काय घडतेय
-दक्षिणपूर्व आशियामध्ये (व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपाईन्स) भयंकर पूर आणि वादळं येत आहेत.
-समुद्राचे पाणी उच्चांकी स्तरावर तप्त आहे (विशेषकरून पश्चिम प्रशांत आणि हिंदी महासागर)
वरील वारे तुटल्याने खालील हवामान अनियंत्रित होते, म्हणजेच पाऊस, वादळ, दुष्काळ सर्वकाही एकदम येऊ लागतात आणि अधिक तीव्र होतात.
1 क्यूबीओ म्हणजे काय
स्ट्रॅटोस्फियरमध्ये एक हवेचे इंजिन आहे, जे पूर्व (ईस्टर्ली) आणि पश्चिम (वेस्टर्ली) वाऱ्यांना एकामागोमाग चालविते. हे इंजिन दर दोन वर्षांमध्ये दिशा बदलते. जे खालील हवामानाला नियंत्रित करते. परंतु 2025 मध्ये एनओएएच्या झोनल विंड डाटासेटमध्ये पश्चिम आणि पूर्व वाऱ्यांचे प्रवाहमार्ग तुटले आहेत, म्हणजेच पूर्णपणे उलटले आहेत.
कारण : हवामान बदलामुळे सागरी पृष्ठभागाचे तापमान वाढले आहे. पश्चिम प्रशांत अणि हिंदी महासागर विक्रमी तप्त आहे (2-3 अंश अधिक), जे वरील वाऱ्यांच्या प्रवाहाला अस्थिर करतात. ला नीनाचा अर्थ समुद्र थंड होणे, वरील वाऱ्याचा बदल आणि खाली ला नीना मिळून डिसरप्शन निर्माण करत आहेत.
प्रभावाचा कालावधी : प्रभाव 15-30 दिवसांमध्ये दिसेल, 2026 पर्यत चालणार आहे. भारतीय हवामान विभागानुसार हे थंडी (2025-26)ला अनियमित करेल.
भारताच्या हवामानावर प्रभाव (2025-26)

- उत्तर-पूर्व मान्सून (ऑक्टोबर ते डिसेंबर 2025)
सामान्य वर्षांमध्ये या हवामानात तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पु•gचेरीत किंचित ते मध्यम पाऊस पडतो. एक किंवा कधीकधी दोन कमकुवत चक्रीवादळे निर्माण होतात, परंतु यावेळी क्यूबीओ तुटल्याने हे हवामान पूर्णपणे बदलले आणि बदलणार देखील. या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा 20-30 टक्क्यांपर्यंत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात 2-3 अत्यंत शक्तिशाली चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात, जी फिलिपाईन्स-व्हिएतनाम यासारख्या वेगाने तीव्र होणाऱ्या चक्रीवादळांप्रमाणे होतील. चेन्नई, कोची, विशाखापट्टणम, काकिनाडा, मछलीपट्टणम यासारख्या किनारी शहरांमध्ये पुन्हा तीव्र पूर येण्याचा धोका आहे. डिसेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यांपर्यंतच आणखी एक मोठी सिस्टीम तयार होऊ शकते.
- थंडीचा ऋतू (डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026)
भारतात हिवाळ्यात जम्मू-काश्मीर, हिमाचलमध्ये हिमवृष्टी तर मैदानी भागांमध्ये किंचित पाऊस पडतो. यावेळी ला नीना यापूर्वीच थंडी वाढवत आहे (तापमान सरासरीपेक्षा 2-4 अंशांनी कमी) परंतु क्यूबीओ तुटणे याला आणखी अनियमित करेल. याचा अर्थ डिसेंबर आणि जानेवारीत अत्यंत तीव्र थंडी पडेल, थंडीची लाट येईल, मग फेब्रुवारीत अचानक तापमान 5-7 अंशांनी वर जाईल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहारमध्ये दाट धुके 10-15 दिवसांपर्यंत सातत्याने राहिल. हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र हिमवृष्टी आणि हिमस्खलनाचा धोका अनेक पट वाढणार आहे.
- उन्हाळा (मार्च ते मे 2026)
सामान्य वर्षांमध्ये मार्च-एप्रिल-मेमध्ये तापमान 40-45 अंशांपर्यत राहते. परंतु क्यूबीओच्या अशाप्रकारे तुटल्यानंतर पुढील उष्णता विक्रमी असणार आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि पूर्व राजस्थानमध्ये तापमान 48-50 अंशांपर्यंत पोहोचू शकते. सातत्याने 15-20 दिवसांपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. क्यूबीओच्या प्रभावामुळे पावसाची सिस्टीम थांबेल, दुष्काळाची स्थिती निर्माण होईल. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्य मागील वर्षांपेक्षा अनेक पटीने वाढू शकतात.