महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा

06:03 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी-एसपी) अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. साहजिकच आता त्यांना सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा कवचाची सर्वोच्च श्रेणी प्राप्त होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी बुधवारी सांगितले. केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार त्यांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

Advertisement

केंद्रीय एजन्सींच्या धोक्मयाच्या मूल्यांकनाच्या पुनरावलोकनात पवारांना मजबूत सुरक्षा कवच प्रदान करण्याची शिफारस करण्यात आली आहे. केंद्राने त्यांना सीआरपीएफ व्हीआयपी सुरक्षा विंगच्या सुरक्षेसाठी झेड प्लस कव्हर दिले आहे. हे काम हाताळण्यासाठी सीआरपीएफची एक टीम आधीपासूनच महाराष्ट्रात असल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्राच्या निर्णयानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी दहा अतिरिक्त सीआरपीएफ जवान तैनात करण्यात येणार आहेत. आरक्षणासंदर्भातील आंदोलने आणि इतर अनेक मुद्यांवर राज्यातील परिस्थिती पाहता गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी केला होता. यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article