For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली-एनसीआरच्या सुरक्षेसाठी स्वदेशी संरक्षण प्रणाली तैनात

06:53 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली एनसीआरच्या सुरक्षेसाठी स्वदेशी संरक्षण प्रणाली तैनात
Advertisement

लढाऊ विमानांचे हल्ले रोखण्यासाठी ड्रोनचा वापर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. दिल्ली-एनसीआरला शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी भारत आता स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली तैनात करत आहे. या तैनातीमुळे दिल्लीला आता क्षेपणास्त्रs, ड्रोन किंवा उंचावरून उडणाऱ्या विमानांमधून होणाऱ्या शत्रूच्या हल्ल्यांपासून पूर्णपणे संरक्षित केले जाईल. ही बहुस्तरीय एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली (आयएडीडब्ल्यूएस) स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांवर आधारित आहे.

Advertisement

बहुस्तरीय एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीमध्ये क्विक रिअॅक्शन सरफेस-टू-एअर मिसाईल सिस्टम (क्यूआरएसएएम) आणि व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टमसारखी (व्हीएसआरएडीएस) क्षेपणास्त्रs समाविष्ट असणार अशी माहिती सुरक्षा विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दिल्ली-एनसीआरच्या सुरक्षेसाठी यासह इतर आवश्यक उपकरणे असतील. संरक्षण मंत्रालयाकडून सदर योजनेवर सध्या काम सुरू आहे. मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भारताने यापूर्वी अमेरिकेकडून राष्ट्रीय प्रगत सरफेस-टू-एअर मिसाईल सिस्टम-2 खरेदी करण्याची योजना आखली होती, परंतु आता स्वदेशी प्रणालींवर भर देण्यात येत आहे. भारत एस-400 सुदर्शन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या उर्वरित दोन स्क्वॉड्रनच्या खरेदीचा पाठपुरावा करत आहे. हे पाऊल स्वदेशी संरक्षण प्रणालींना मोठी चालना देईल आणि भारताची सुरक्षा आणखी मजबूत करेल.

Advertisement
Tags :

.