For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मल्लिकार्जुन खर्गेंना ‘झेड प्लस’ सुरक्षा

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
मल्लिकार्जुन खर्गेंना ‘झेड प्लस’ सुरक्षा
Mallikarjun Kharage

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर झेड प्लस सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांची 2022 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. हे पद मिळाल्यापासून त्यांचे महत्त्व वाढल्यापासून धोकाही तितकाच वाढला आहे. त्यामुळेच केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या अहवालानंतर खर्गे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार असून आता त्यांना सीआरपीएफ जवानांचे सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे. नजिकच्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे दौरे वाढणार असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेबाबत तातडीने निर्णय घेतला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.