युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाची चर्चांना उधाण
मुंबई
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा सध्या रंगली आहे. दोघांच्या नात्यामध्ये काही वाद सुरू असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. म्हणून दोघे लवकरच घटस्फोट घेण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे. दोघांनी इन्टाग्रामवर एकमेकांना अनफॉ़लो केलेले आहे. आणि दोघांनीही यावर मौन बाळगले आहे.
युजवेंद्र चहल याने त्याच्या सोशल मिडीया हॅण्डेलवरूनही बायको धनश्रीसोबतचे फोटो डिलीट केले आहेत. याचर्चे दरम्यान धनश्री ला पॅपराझींनी स्पॉट केले. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाचा व्हायरल होत आहे.
धनश्री आणि युजवेंद्र यांचे २०२० डिसेंबर मध्ये लग्न झाले. त्यांनी लग्नाच्या आधी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले आहे. धनश्री आणि युदवेंद्र चहल यांनी एकत्रितपणे झलक दिखला जा ११ या सिझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. याशिवाय धनश्री सोशल मिडीयावर कायम सक्रिय असते.