महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युट्यूबर एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या

06:37 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने युट्यूबर एल्विशन यादवला 23 जुलै रोजी लखनौतील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. हे प्रकरण रेव्ह पार्ट्यांमध्ये सापांच्या विषाचा नशेच्या स्वरुपात वापर करण्याशी निगडित आहे. केंद्रीय यंत्रणेने या प्रकरणी मे महिन्यात गुन्हा नोंदविला होता.

Advertisement

नोएडामध्ये एल्विश यादव आणि अन्य काही जणांच्या विरोधात पीएमएलए अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला होता. आता याप्रकरणी ईडीने नवा समन्स जारी करत एल्विश यादवला लखनौ येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

एल्विश यादवला चालू आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचा निर्देश देण्यात आला होता, परंतु विदेशात असल्याने एल्विशने पुढील काही दिवसांची मुदत देण्याची मागणी केली होती. यानुसार ईडीने 23 जुलै रोजी हजर राहण्याचा समन्स बजावला आहे.

हरियाणातील गायक राहुल यादव याची चालू आठवड्यात ईडीने चौकशी केली होती. राहुल यादव हा एल्विश यादवशी संबंधित असल्याने त्याची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article