For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘यूट्यूब’ने 22.5 लाख व्हिडिओ काढून टाकले

06:28 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘यूट्यूब’ने 22 5 लाख व्हिडिओ काढून टाकले
Advertisement

मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याने  भारतातील व्हिडीओवर कारवाई

Advertisement

नवी दिल्ली :

यूट्यूबने मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतातील 22.5 लाख व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत. ही कारवाई ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान करण्यात आली. या यादीत भारत अव्वल आहे. यूट्यूबच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वे अंमलबजावणी अहवालानुसार, याच कालावधीत जागतिक स्तरावर 9 दशलक्ष व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत.

Advertisement

नियमांचे उल्लंघन करणारे हे व्हिडिओ केवळ मशिनद्वारेच आढळून आल्याचे यूट्यूबने म्हटले आहे. यापैकी 53.46 टक्के व्हिडिओ ह्यूज मिळण्यापूर्वीच काढून टाकण्यात आले. काढण्यात आलेले एकूण 27.07 टक्के व्हिडिओ असे होते ज्यांना 1 ते 10 ह्यू मिळाले होते. विशेष म्हणजे मशीनद्वारे अपलोड होणाऱ्या व्हिडिओंची संख्या वाढत आहे.

यूट्यूबनेही जागतिक स्तरावर दोन कोटी चॅनेलवर बंदी घातली आहे. मागील तिमाहीत कारवाई झालेल्या चॅनेलच्या संख्येपेक्षा ही संख्या जवळपास दुप्पट आहे. जेव्हा एखाद्या चॅनेलवर कारवाई केली जाते तेव्हा त्याचे व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकले जातात.

चॅनेल स्तरावरील निर्बंधांमुळे यूट्यूबने त्याच्या प्लॅटफॉर्मवरून अंदाजे 9.55 कोटी व्हिडिओ काढून टाकले आहेत. स्पॅम आणि दिशाभूल करणारा मजकूर हे चॅनेलवर बंदी घालण्याचे मुख्य कारण होते. यामध्ये स्पॅम व्हिडीओजचे प्रमाण 92.8 टक्के होते, तर नग्नता आणि लैंगिकतेचे व्हिडिओचे प्रमाण 4.5 टक्के होते.

कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘90 दिवसांत तीन वेळा  मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली जाते.‘ भारतानंतर सिंगापूर आणि त्यानंतर अमेरिका दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते. यूट्यूबने 2023 च्या चौथ्या तिमाहीत त्याच्या प्लॅटफॉर्मवरून 1.1 अब्ज प्रतिक्रिया काढून टाकल्या.

Advertisement
Tags :

.