For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन आयपीओ शेअरबाजारात खुले

06:45 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन आयपीओ शेअरबाजारात खुले
Advertisement

टीबीओ टेक, आधार हाऊसिंग फायनान्समध्ये 10 मे पर्यंत गुंतवणुकीची संधी

Advertisement

मुंबई :

बुधवारपासून(8 एप्रिल 2024) टीबीओ टेक लिमिटेड आणि आधार हाउसिंग फायनान्स यांचे प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणजे आयपीओ खुले झाले आहेत. यामध्ये गुंतवणूकदारांना 10 मे पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. याचदरम्यान शेअरबाजारात याआधी इंडोजेन लिमिटेडचा आयपीओ बाजारात खुला झाला होता, जो बुधवारी बंद झाला आहे.

Advertisement

टीबीओ टेकला या आयपीओद्वारे 1,550.81 कोटी रुपये उभारायचे आहेत. यासाठी, कंपनी 400 कोटी किमतीचे 4,347,826 ताजे शेअर्स सादर करेल. कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 1,550.81 कोटी किमतीचे 16,856,623 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकतील. किरकोळ गुंतवणूकदार 8 ते 10 मे या कालावधीत या आयपीओसाठी बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध केले जाणार असल्याची माहिती आहे.

19हजारची करता येणार गुंतवणूक

टीबीओ टेकने समभागाची किंमत 875-920 निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 16 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. आयपीओच्या सीएचएनच्या प्राइस बँडवर 920 वर 1 लॉटसाठी अर्ज केल्यास 14,720 ची गुंतवणूक करावी लागेल. तर, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी म्हणजेच 208 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. यासाठी गुंतवणूकदारांना वरच्या किंमतीच्या बँडनुसार 191,360 ची गुंतवणूक करावी लागेल.

आधार हाऊसिंगचा आयपीओ ख्gला झाला असून 300-315 ऊपये प्रतिसमभाग किंमत निश्चित करण्यात आली आहे. कंपनी 3 हजार कोटी ऊपयांची उभारणी करणार आहे.

Advertisement
Tags :

.