महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाळुंग येथे एकाचा युवकाचा निर्घूनपणे खून, तीन सख्या भावासह पाचजण ताब्यात

11:39 AM Feb 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
Solapur Murder
Advertisement

श्रीपूर / वार्ताहर

Advertisement

महाळुंग (ता.माळशिरस) येथे मिरे रोडलगत असलेल्या स्मशानभुमीचे ठिकाणी एका युवकाचा निर्घूनपणे खून झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. शिवाजी विठ्ठल चव्हाण (वय २२) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी महाळुंग येथीलच तीन सख्या भावांना व दोघे असे पाच जणांना अटक केली आहे.

Advertisement

सकाळी त्याचा मृतदेह महाळुंग गावातील स्मशानभूमीमध्ये आढळून आला, सत्तुर सारख्या हत्याराने त्याचा निर्गुण खून करण्यात आला आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावरून एक मोटर सायकल, मोबाईल आणि दोन तीक्ष्ण हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी शोध घेण्यासाठी श्वान पथक मागवले होते.

घटनेची माहिती मिळताच अकलुज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सपोनि गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंके, महिला पोलीस उपनिरीक्षक महाडीक, डी.बी. पथकातील सुहास क्षिरसागर, प्रविण हिंगणगावकर, नितीन लोखंडी, रणजित जगताप तसेच श्रीपूर दुरक्षेत्राचे एएसआय पानसरे, पोलीस अंमलदार गायकवाड, चंदनशिवे, गुरव असे घटनास्थळी जावून पाहणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी चव्हाण हा हलगी वाजवण्यात तरबेज होता. मयताचा भाऊ शंकर विठ्ठल चव्हाण (वय २४) वर्षे, याच्या म्हणण्यानुसार ०२ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते ०३ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वा. चे दरम्यान कालावधीत माझा भाऊ शिवाजी विठ्ठल चव्हाण (वय २२) वर्षे यास सोमनाथ महादेव माने, अशोक महादेव माने, पिंटू महादेव माने, दिनेश सोमनाथ माने, प्रदिप मधुकर चव्हाण सर्व (रा.महाळुंग ता.माळशिरस) यांनी संगणमत करुन महाळुंग गावातील स्मशानभुमीत बोलावून घेवून अशोक माने याचे मुलगी सोबत अनैतिक संबंध आहेत असा संशय घेवून त्या संशयावरुनच त्यांनी मिळून भाऊ शिवाजी यास लोखंडी सत्तूर व कत्ती हत्याराने डोकीत वार करुन त्याचा खून केला असल्याचा माझा त्यांचे विरुध्द संशय आहे म्हणून तक्रार दिली आहे.

सदर प्रकरणी अकलुज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६३/२०२४ भा.द.वि.सं.क.३०२, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट १३५, सह अनुसुचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्यचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे सुधारीत अधिनियम २०१५ चे कायदा कलम ३(२)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, चार्ज अकलूज विभाग, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडील डी.बी.पथकाने तात्काळ माहिती काढून आरोपींचा शोध घेवून शिताफीने सर्व आरोपींचा ताब्यात घेतले असून गुन्हयाचा पुढील तपास अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, चार्ज अकलुज हे करीत आहेत.

Advertisement
Tags :
murderesolapurtarun bharat news
Next Article