Satara News : साताऱ्यात प्लॉटच्या बहाण्याने 62 लाखांची फसवणूक
आर्थिक फसवणूक प्रकरण सातारा शहरात
सातारा : सातारा येथे प्लॉट बघितला आहे, त्या प्लॉटला पैसे लागणार आहेत. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मला पैसे द्या, मी तुम्हाला एक वर्षात पैसे दुप्पट करून देतो आणि तुम्हाला प्लॉट देतो असे सांगून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात ४२० कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय शिवचरण मोदी (वय ५५ वर्ष राहणार प्रथमेश गॅलेक्सी शनिवार पेठ सातारा) यांना त्यांचे मेहुणे उदय अशोक मोदी (राहणार ३९०/२ प्लॉट नंबर १३ गुलमोहर कॉ लनी करंजे शाहूपुरी) यांनी सातारा येथे प्लॉट बघितला आहे. त्या प्लॉटला मला काही पैसे लागणार आहेत. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही मला पैसे द्या मी तुम्हाला एक वर्षात पैसे दुप्पट करून देतो आणि तुम्हाला प्लॉटही देतो.
तसेच मी तुमचा नातेवाईक आहे मी तुमची फसवणूक करणार नाही, असे सांगून संजय मोदी यांच्याकडून घराच्या व्यवहारातून आलेली रक्कम व त्यांच्याकडे असलेली सर्व जमापुजी असे सुमारे ४० लाख रुपये रोख तसेच पत्नी दिपाली व आई चारुशीला, आजी सुंदराबाई यांचे मिळून घरात असलेली सुमारे १५० तोळे सोन्याचे दागिने असा अंदाजे रक्कम ३८ लाख रुपये असे एकूण ७८ लाख रुपये घेऊन त्यापैकी फिर्यादीला मदत म्हणून एकूण १५ लाख ९९ हजार रुपये देऊन ९ डिसेंबर रोजी पर्यंत मोबदला म्हणून १ करोड रुपये व एक प्लॉट देतो असे सांगून फिर्यादीची ६२ लाख १००० रुपयेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार झेंडे करत आहेत.