‘गुरु’ पार्कचा युवकांनी लाभ घ्यावा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : गोवा विद्यापीठाच्या रिसर्च पार्कचे उद्घाटन
पणजी : गोवा विद्यापीठ रिसर्च पार्क युनिटचे (गुरु) उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते विद्यापीठाच्या आवारात काल बुधवारी करण्यात आले. आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलोजी अशा विविध क्षेत्रात अभ्यास कऊन पुढे जाण्यासाठी व स्वत:चा व्यवसाय (स्टार्ट-अप) चालू करण्यासाठी त्या पार्कचा युवकांना मोठा लाभ होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. या रिसर्च पार्क अंतर्गत विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि योजनांचा फायदा घेण्याकरीता अनेकांना डॉ. सावंत यांच्याहस्ते मंजुरी पत्रे देण्यात आली. या गुऊ प्रकल्पात रु. 12.85 कोटीची गुंतवणूक करण्यात आली असून त्यात विविध प्रकारच्या सेवा, सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उद्योन्मुख तरुणांना विविध क्षेत्रात व्यवसाय उद्योग सुऊ करण्यासाठी हे गुरु पार्क मार्गदर्शक ठरणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
कृषी, बायो-इंजिनियरेंग इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातही भरारी घेण्यासाठी हे पार्क उपयोगी ठरणार आहे. त्याचा फायदा तरुणांनी कऊन घ्यावा आणि विविध क्षेत्रात आपापला विकास साधावा. या पार्कचा मोठा लाभ गोवा विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक-शिक्षकवर्ग यांना होणार असून त्यातून विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी प्राप्त होणार आहे असेही डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले. गोवा विद्यापीठाला या प्रकल्पाची आवश्यकता होती ती पूर्ण झाली असून विद्यापीठाचे मानांकन आता उंचावेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या पार्कबद्दल त्यांनी गोवा विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालनालयाचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाचे उपकुलगुऊ हरीलाल मेनन आणि शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यावेळी उपस्थित होते.
गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरले कसे?
गोवा विद्यापीठास सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध कऊन देखील त्याचे मानांकन घसरले कसे? असा थेट सवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुऊ ‘पार्क’च्या उद्घाटनप्रसंगी केला. विद्यापीठातील 50 टक्के विद्यार्थाना गोवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती नाही. तसेच 80 टक्के विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांना घाबऊन बसतच नाहीत, अशी विचारणा त्यांनी उपस्थितांना केली आणि मानांकन सुधारा असे बजावले.