माजगावात गवारेड्याची दुचाकीला धडक ; युवक गंभीर
11:31 AM Jul 05, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी - रेडी मार्गावरील माजगाव येथील कै.भाईसाहेब सावंत समाधीजवळ अचानक समोर आलेल्या गवारेड्याने भर रस्त्यावर दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार सागर प्रभाकर मळगाव ( ३६ रा.मळगाव आंबेडकर नगर ) हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तो जाग्यावरच पडून होता.त्यानंतर स्थानिकांनी व तेथे जमलेल्या काही वाहनधारकांनी रिक्षात घालून याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तेथे त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article