अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरुणास 20 वर्षांचा सश्रम कारावास
04:52 PM Jul 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
ओरोस प्रतिनिधी
Advertisement
अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत (26) रा.परुळे याला दोषी धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी त्याला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 30 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित मुलीला योग्य न्याय मिळाला. अशा अन्यायग्रस्त पिडीत मुलींना न्यायालयाचे संरक्षण असल्याचे सिद्ध झाले आहे. भविष्यात समाजातील अशा प्रवृत्ती अशी कृत्ये करण्यास धजावणार नाहीत असा विश्वास व्यक्त करीत ॲड.रूपेश देसाई यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले.
Advertisement
Advertisement