महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुरमुरीच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

10:42 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उचगाव : तुरमुरी ता. बेळगाव येथील एका 36 वर्षीय युवकाने बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील तुरमुरी-बाची हद्दीलगत असलेल्या ब्रह्मदेव मंदिराच्या मागील बाजूस काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सहदेव माऊती डोंबले असे त्याचे नाव आहे. सहदेव हा पहाटे चारच्या सुमारास घराबाहेर पडल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी तलावाच्या काठावर असलेल्या झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. सहदेव डोंबले याचे पाच वर्षांपूर्वी गावातीलच भक्तीकर घराण्यातील मुलीशी लग्न झाले असून, त्याला साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, चार भाऊ, बहीण असा परिवार आहे. सकाळी काही नागरिकांना तलावाच्या काठावरील झाडाला गळफास घेतल्याचे दिसताच वडगाव पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. वडगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा ऊग्णालयामध्ये दाखल केला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेसंदर्भात वडगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article