For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरगेत डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

04:16 PM Jun 30, 2025 IST | Radhika Patil
आरगेत डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
Advertisement

खुनानंतर मृतदेह विवस्त्र करून तलावात टाकला; दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

Advertisement

मिरज :

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग गावात एका भोळ्या स्वभावाच्या तरुणाची समलिंगी शरीरसुखाची मागणी नाकारल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (दि. ३० जून) सकाळी उघडकीस आली असून, मृत तरुणाचे नाव सुजय बाजीराव पाटील (वय २३) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सुजय पाटील हा रविवारी रात्री बेळंकी येथे आयोजित हळदीच्या कार्यक्रमासाठी त्याचे दोन अल्पवयीन मित्रांसोबत गेला होता. कार्यक्रमानंतर परतताना तिघांनी मद्यपान केले. परतीच्या वाटेवर आरग गावातील पाझर तलावाजवळ सुजयच्या एका मित्राने समलिंगी शरीरसुखाची मागणी केली. सुजयने यास तीव्र विरोध दर्शवला.

विरोध केल्यानंतर सुजयला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याला तलावात बुडवून जिवे मारण्यात आले, अशी कबुली पोलिस तपासात समोर आली आहे. लाथाबुक्क्यांनी आणि दगडांनी मारहाण केल्याने त्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या आहेत. मृतदेह विवस्त्र अवस्थेत मिळाल्यामुळे पोलिसांनी संशय घेऊन सखोल चौकशी केली असता, हा समलिंगी शरीरसुखाच्या मागणीवरून घडलेला खून असल्याचे उघड झाले.

या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.