For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिराजवळ अपघात! मोटरसायकलस्वार युवकाचा मृत्यू

04:40 PM Jun 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिराजवळ अपघात  मोटरसायकलस्वार युवकाचा मृत्यू
Accident
Advertisement

शिराळा प्रतिनिधी

शिराळा येथील बाह्य वळण रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिराजवळ मोटारसायकलला चारचाकी गाडीने धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार युवकाचा मृत्यू झाला. संतोष उत्तम ताईंगडे ( वय 35, रा. तळमाऊली ता. पाटण , जिल्हा सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे. सदर अपघात शुक्रवार दि.21 रोजी दुपारी दोन च्या दरम्यान घडला.

Advertisement

याबाबत माहिती अशी की , मयत संतोष ताईंगडे हे आपले मांगले येथील मित्राला भेटण्यासाठी मोटारसायकल ( क्रमांक एम एच 11 ए एस 1958) वरून निघाले होते. यावेळी चारचाकी गाडी ( क्रमांक एम एच 11 ए के 2648) करण हरिभाऊ सोमोशे ( वय 25 , रा.पलूस ) हे कोकरूड कडून पलूस कडे निघाले होते. यावेळी या दोन्ही गाड्यांची धडक झाली.यामध्ये मोटारसायकल स्वार संतोष ताईंगडे यांचा मृत्यू झाला.याबाबत फिर्याद विजय खांबे दिली असून पुढील तपास शिराळा पोलीस करीत आहेत. मयत संतोष ताईंगडे हे मुंबई येथील खाजगी कंपनीत फार्मा†सस्ट म्हणून नोकरीस होते.त्यांचे पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.