Sangli News : सांगलीत दत्तजयंती उत्साहात साजरी; शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
सांगली उपनगरातील दत्तमंदिरांमध्ये भारूड
सांगली : शहरात दत्तजयंतीनमित्त विविध दत्त मंदिरांमध्ये गुरुवारी पहाटेपासून भाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमासाठी गर्दी केली होती. तर जन्मकाळानंतर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर अनेक ठिकाणी असलेल्या जन्मकाळ व महाप्रसादाचाही भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.गेले आठवडाभर शहरामधील प्रसिद्ध दत्तमंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तर गुरुवारी ४ डिसेंबर रोजी मुख्य दिवशी दत्त जयंतीनिमित पहाटेपासूनच विविध दत्तमंदिरांमध्ये विधिवत पूजाअर्चा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यानिमित्ताने शहर परिसरातील अनेक प्रसिद्ध दत्तमंदिरांना आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यातआली होती. तसेच शहरातील विविध दत्त मंदिरात गुरुचरित्र ग्रंथ वाचन मजन, किर्तन, पारायण आदी विविय कार्यक्रम गेले आठवडाभर सुरू होते त्याची सांगता गुरुवारी झाली.
शहरातील शंभरफुटी परिसरातील साई दत्तमंदिर, ग्रामीण पोलीस स्टेशनसमोरील दत्तमंदिर, फौजदार गल्लीतील दत्तमंदिर, डॉ. अविनाश पाटील यांच्या दत्तमंदिर, पॉवर हाऊस परिसरातील कॉलनी, कॉर्नर दत्तमंदिर, गव्हर्मेंट सह्याद्रीनगर, कॉलेज रिक्षा स्टॉप, दत्तमारुती रोडवरील मंदिर, सांगलीवाडीतील खाडीलकर दत्तमंदिर, दत्तनगर व काकानगर येथील दत्तमंदिरामध्ये दत्तजयंती निमित्त भजन, किर्तन, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच इतर उपनगरातील दत्तमंदिरात भजन, भारूड, किर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. फौजदार गल्ली येथील दत्तमंदिर परिसरात मृत्युंजय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शुक्रवारी येथे महाप्रसादाने जयंतीची सांगता होणार आहे.