For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवानेते अमान सेठ यांनी सहकाऱ्यांसोबत कणबर्गी परिसरातील जाणून घेतल्या समस्या

01:30 PM Jan 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
युवानेते अमान सेठ यांनी सहकाऱ्यांसोबत कणबर्गी परिसरातील जाणून घेतल्या समस्या
Advertisement

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघातील कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर, जगजीवन राव उद्यान यासह परिसरातील इतर महत्त्वाच्या भागातील रहिवाशांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्यावतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी युवा नेते अमान सेठ आपल्या सहकाऱ्यां सोबत भेट दिली. या दरम्यान आंबेडकर गल्ली येथील स्थानिक रहिवाशांशी भेटून त्यांच्या समस्यां जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

Advertisement

या परिसरातील रस्त्यांची स्थिती, सार्वजनिक सुविधा, स्वच्छता, आणि या भागातील मध्यवर्ती असलेल्या जगजीवन राव उद्यान या सारख्या स्थानिक हिरव्यागार निसर्गरम्य स्थळांची पाहणी करून येथे भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले. विशेषतः आंबेडकर गल्लीतील रहिवाशांनी कचरा व्यवस्थापन आणि उत्तम संपर्क व्यवस्था या बद्दलची आवश्यकता आणि त्याबद्दलची चिंता व्यक्त केली. यामुळे थेट परस्पर संवाद साधला गेल्याने अमन सेठ आणि त्यांच्या सोबत आलेल्या सहकाऱ्यांना तात्काळ हस्तक्षेप करून समस्यां सोडविण्यासाठी मदत मिळाली.

यावेळी पुढे बोलताना युवा नेते अमन सेठ म्हणाले कि, आमचे उद्दिष्ट कायदेमंडळात केवळ प्रतिनिधी म्हणून काम करण्यापेक्षा समाजात राहून नागरिकांची सेवा करण्याला जास्त महत्व आहे. आपल्या भागातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना विकसित करण्यावर आम्ही भर देत आहोत. हा उपक्रम आमदार असिफ (राजू) सेठ आणि यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते अमान सेठ आपल्या प्रतिनिधींसोबत पायाभूत सुविधा आणि रहिवाशांचे एकूण राहणीमानात सुधारणा करण्यावर लक्ष पुरवून अधिक प्रतिसाद देणारा आणि सुसज्ज मतदारसंघ तयार करण्याच्या दिशेने अविरत कार्य करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.