महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पांझरखणी-कुंकळळी अपघातात युवक जागीच ठार

01:28 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : पांझरखणी-कुंक्कळी येथे कार आणि दुचाकी यांच्यात काल शनिवारी पहाटे 4.45 वाजता झालेल्या भीषण अपघातात कुंकळळी येथील यश संदेश घोडेकर (24) या युवक जागीच ठार झाला. या अपघात प्रकरणी कुंकळळी पोलिसांनी कार चालक गिरीश कोमरपंत याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. कुंकळळी पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहिती प्रमाणे, पांझरखणी-कुंकळळी येथील बर्फाच्या फॅक्टरीजवळ हा अपघात झाला. पाळोळे-काणकोण येथील गिरीश शिवा कोमरपंत हा कार क्रमांक जीए 02 जे 8439 ने काणकोणहून मडगावच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. या कारने मडगावहून कुंकळळीच्या दिशेने जाणाऱ्या अॅक्टिव्हा स्कुटर क्रमांक जीए 08 एजी 4609 ला जोरधार धडक दिली. त्यात स्कुटर चालक यश घोडेकर हा युवक स्कूटरसह रस्त्यावर पडला व जागीच ठार झाला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारमध्ये कल्पना गिरीश कोमरपंत ही महिला होती. तिला साधी जखम झाल्याने तिला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताचा पंचनामा कुंकळळी पोलिसांनी केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कविता रावत करीत आहे.
Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article