कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून नुगानट्टीत तरुणाचा खून

11:14 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून नुगानट्टी (ता. यरगट्टी) येथील एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री नुगानट्टी येथे ही घटना घडली असून याप्रकरणी त्याच गावातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुरगोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बसवराज गुरुलिंगाप्पा मुद्दण्णावर (वय 23) रा. नुगानट्टी असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. चाकूने भोसकून व दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला आहे. वाढदिवसाला बोलावून त्याचा काटा काढण्यात आला आहे. मंगळवारी मल्लिकार्जुन गिडी या तरुणाचा वाढदिवस होता. गावाजवळच पार्टीसाठी बसवराजलाही बोलाविले होते. वाढदिवसावेळी आकाश विष्णू होंडप्पन्नवर याच्याबरोबर झालेल्या वादावादीनंतर बसवराजचा खून केला आहे. याप्रकरणी आकाशसह प्रकाश सोमप्पा कोदण्णावर, मल्लिकार्जुन बसाप्पा हरिजन, निलप्पा यमनाप्पा रामन्नावर, यमनाप्पा मल्लाप्पा कसळ्ळी या पाच जणांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेला बसवराज हा सुशिक्षित होता. आपल्या शिक्षणाचा वापर गावातील कामांसाठी तो करीत होता. याच कारणावरून आकाश व बसवराज यांच्यात वादावादी होऊन खून करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article