कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयशर व दुचाकी अपघातात नेरूर येथील युवक जागीच ठार

05:31 PM Feb 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दुचाकीवरील अन्य दोघे युवक गंभीर जखमी ; पिंगुळी रेल्वे ब्रीज नजीकची घटना

Advertisement

कुडाळ -.

Advertisement

कुडाळ - वेंगुर्ले मुख्य रस्त्यावर पिंगुळी रेल्वे ब्रीज नजीक आयशर टेम्पो व ज्यूपिटर दुचाकीची समोरासमोर जोराची धडक बसून झालेल्या अपघातात नेरूर - पंचशीलनगर येथील दुचाकीस्वार हरेश संतोष नेरूरकर ( 19) हा युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील प्रथमेश प्रकाश नेरुरकर ( 27 , रा. नेरूर पंचशीलनगर,सध्या रा.नालासोपारा - मुंबई ) व सुमित जाधव ( 23, रा.नालासोपारा - मुंबई ) हे गंभीर जखमी झाले.त्यांना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.आज दुपारी ज्युपिटर दुचाकीवरून हरेश नेरुरकर,प्रथमेश नेरुरकर व सुमित जाधव हे कुडाळहून पिंगुळी म्हापसेकर तिठ्याच्या दिशेने जात होते. पिंगुळी रेल्वे ब्रीज नजीक सदर दुचाकीची समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोला जोराची धडक बसली.यात दुचाकीस्वार हरेश नेरूरकर याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला,तर प्रथमेश व सुमित गंभीर जखमी झाले.त्या दोघांना 108 रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून प्रथमेश याला बांबुळी गोवा येथे अधिक उपचारासाठी, तर सुमित याला ओरोस येथीप जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले.धडक एवढी जबरदस्त होती की, ज्युपिटर दुचाकीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या घटनेने नेरुर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# accident # nerur # kudal # news update# konkan update #
Next Article