हलगा गावातील तरुणांनी केली गडकोट मोहीम
वार्ताहर / किणये
हलगा येथील धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील मंडळाच्या युवकांनी विविध गड किल्ल्यांची मोहीम केली आहे. दिवाळीनिमित्त मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास तरुणांना समजावा. त्यांचे आचार विचार तरुणांनी आचरणात आणावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. रायगड, राजगड, तोरणा, पुरंदर, शिवनेरी, वासोटा, जीवधन, चावंड, नाणेघाट, वढू तुळापूर, तसेच ज्योतिर्लिंग, गणपतीपुळे, अष्टविनायक गणपती अशा गड-किल्ल्यांसह देवदर्शन त्यांनी केले. या गड किल्ल्यांच्या माध्यमातून त्यांनी शिवकालीन इतिहास जाणून घेतला. ही मोहीम बेळगावातील मोठी मोहीम ठरली आहे. सलग दहा दिवस सह्याद्रीच्या कुशीत हे धारकरी होते. या मोहिमेत मनोज बाळेकुंद्री, राजू कणबरकर, भैरू बिळगुचे, प्रदीप बिलगोजी, प्रकाश मास्तमर्डी, प्रमोद पुन्नाजी, सौरभ बिलगोजी, सुनील कानोजी, प्रसाद पुन्नाजी, प्रवीण सुळगेकर, राजू तारिहारकर, आनंद पुन्नाजी, प्रमोद पाटील, राजू पुन्नाजी आदी युवकांनी सहभाग घेतला होता.