Kolhapur News : पुलाची शिरोलीत युवकाचा नदीत बुडून मृत्यू
पंचगंगा नदीत मित्रांसोबत गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
पुलाची शिरोली : पुलाची शिरोलीतील तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. आसिफ उर्फ अकबर चाऊस (वय ३४) असे मृताचे नाव आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात यांची नोंद झाली आहे.
याबाबत शिरोली पोलिसांकडून एमआयडीसी समजलेली माहिती अशी की, आसिफ हा शिरोलीतील माळवाडी भागातील एका लहान औद्योगिक कंपनीत कामाला होता. रविवारी कंपनीतील पाच जणांनी स्मॅक कार्यालयाशेजारी पंचगंगा नदीशेजारी जेवणाची ओली पार्टी केली होती. जेवण झाले नंतर हे सर्वजण नदीमध्ये पोहायला गेले होते. यावेळी आसिफ हा पाण्याच्या प्रवाहात घोटमळू लागला. तर उर्वरित चौघेजण बाहेर आले.
त्यानंतर आसिफ दिसेनासा झाला त्यामुळे हे चौघेजण तेथून पळून घरी गेले. त्यांनी याबाबतची कसलीही माहिती आसिफच्या नातेवाईकांना अथवा पोलिसांना दिली नाही. रविवारी रात्री उशिरा तो घरी न आल्यामुळे तो बेपत्ता असल्याची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी दिली होती.
त्यानंतर मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्याबर तरंगताना पोलिसांना दिसला. एमआयडीसी पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करुन तसा गुन्हा नोंद करण्याचा आग्रह धरला होता. दवाखान्यात पाठवला.
सदर घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी त्याच्या चार मित्रांना रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आणले होते. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली असून सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.