For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत - दक्षिण आफ्रिका मालिकेतील आज निर्णायक सामना

06:55 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत   दक्षिण आफ्रिका मालिकेतील आज निर्णायक सामना
Advertisement

‘रो-को’कडून पुन्हा प्रभावी कामगिरीची आशा, अपयशी ठरलेल्या जैस्वालवरही राहील लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ शाखापट्टणम

आज शनिवारी येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या मालिकेतील लाजिरवाण्या पराभवापासून वाचण्यासाठी घरच्या संघाला प्रयत्न करावे लागतील तेव्हा बहुतेक वेळा लक्ष विराट कोहली आणि रोहित शर्मावर असेल, परंतु दबाव भारताच्या तऊण खेळाडूंवरही असेल. कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवल्यानंतर रायपूरसारख्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय मालिकाही जिंकता येईल.

Advertisement

सध्याच्या परिस्थितीत, विशेषत: जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये गट पडल्याचे दिसून येते, तेव्हा भारतासाठी सलग मालिका पराभव अकल्पनीय आहे. या मालिकेतील विजय काही काळासाठी संघाभोवतीच्या चर्चेला विराम देऊ शकतो आणि त्यासाठी कोहली आणि रोहितला पुन्हा एकदा जबाबदारी सांभाळावी लागेल. दोघांचेही 50 षटकांच्या स्वरूपावर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे आणि अशा कठीण परिस्थितीशी ते अपरिचित नाहीत. शेवटी त्यांचा वारसा अडचणींवर मात करण्याभोवती उभारला आहे आणि गेल्या दीड दशकातील हा एक रोमांचक प्रवास आहे. आता कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात कोहली आणि रोहित यशाच्या दीर्घ पुस्तकात आणखी एक गौरवशाली अध्याय जोडू इच्छितात.

कोहलीने त्याच्या शेवटच्या तीन डावांमध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे, तर रोहितने त्याच्या शेवटच्या चार डावांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. हे आकडे त्यांचा स्पर्श, दर्जा आणि भूकेबद्दल सांगतात, जे दर्शविते की, ते अजूनही संघाला वाचवू शकतात. पण गेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आपले पहिले एकदिवसीय शतक झळकावल्यामुळे तऊण फलंदाजांकडून असा अर्थपूर्ण पाठिंबा मिळण्याची त्यांना अपेक्षा असेल.

पण यशस्वी जैस्वालला अजूनही या मालिकेत सलामीवीर म्हणून त्याची क्षमता सापडलेली नाही आणि हा प्रतिभावान तऊण त्याच्या आणि संघाच्या फायद्यासाठी त्याच्या चांगल्या सुऊवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यास उत्सुक असेल. डावखुऱ्या जलद गोलंदाजांविऊद्ध खेळताना त्याच्या फलंदाजीत स्पष्ट त्रुटी दिसते, मग तो वेस्ट इंडिजचा जेडेन सील्स असो किंवा या मालिकेतील मार्को जॅनसेन आणि नांद्रे बर्गर. त्याच्या कारकिर्दीत डावखुऱ्या गोलंदाजांनी त्याला 30 वेळा (कसोटीत 9, टी-20 मध्ये 19 आणि एकदिवसीय सामन्यात 2 वेळा) बाद केले आहे. प्रामुख्याने चेंडू कट आणि तत्सम प्रयत्न करताना तसेच ऑफ स्टंपच्या बाहेर खेळताना तो बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.

जैस्वाल आणि संघ व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत आणि ते सुधारण्याचे काम आधीच सुरू झाले असेल. पण जर हा प्रवाह असाच सुरू राहिला, तर व्यवस्थापनाला इतर पर्यायांकडे पाहण्यास भाग पाडले जाऊ शकते आणि त्यांच्याकडे गायकवाडसारखा खरा सलामीवीर आहे. एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवरील खेळपट्टी बहुतेकदा फलंदाजांना अनुकूल राहिलेली आहे आणि भारताचा येथे खूप प्रभावी कामगिरी राहिलेली आहे. जरी ऑस्ट्रेलियाविऊद्धचा मागील सामना पराभवात संपला असला, तरी 2005 पासून 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये सात विजय त्यांनी मिळविलेले आहे.

भारताला वॉशिंग्टन सुंदरला विश्रांती द्यायची की नाही आणि तिलक वर्माला मधल्या फळीची फलंदाजी मजबूत करण्यासाठी आणायचे की नाही यावर सखोल विचार करेल. कारण गेल्या दोन सामन्यांच्या शेवटी वेग वाढवण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. रिषभ पंत देखील यासाठी योग्य उमेदवार असू शकतो, परंतु तिलक एक उपयुक्त फिरकी गोलंदाज आहे आणि तो चांगला क्षेत्ररक्षकही आहे. के. एल. राहुलच्या झुंजार अर्धशतकांमुळे भारताला दोन्ही सामन्यांत मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले, परंतु दवाने दक्षिण आफ्रिकेला रांचीमध्ये लक्ष्याच्या जवळ पोहोचण्यास आणि रायपूरमध्ये लक्ष्य पार करण्यास मदत केली.

पण या किनारी शहरात चक्रीवादळामुळे तापमानात अलीकडेच घट झाली असली, तरी रात्री आर्द्रतेचा घटक महत्त्वाचा ठरेल. शुक्रवारी विद्युतझोतातील सराव सत्रामुळे भारताला परिस्थिती समजून घेण्यास आणि त्याद्वारे संघाची रचना थोड्या चांगल्या प्रकारे ठरविण्यास मदत होईल. भारताला आशा आहे की, त्यांचे तऊण वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पेलतील आणि प्रभावी अर्शदीप सिंगला जोरदार पाठिंबा देतील.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिका 2022-23 नंतर भारतावर त्यांचा दुसरा एकदिवसीय मालिका पराभव ओढवू इच्छित असेल. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 2-1 असा विजय मिळवला होता. जर तसे घडले, तर या भूमीतील दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच एकदिवसीय मालिका विजय असेल. ते वेगवान गोलंदाज बर्गर आणि फलंदाज टोनी डी झोर्झी यांच्या तंदुऊस्तीवर लक्ष ठेवतील. कारण दोघांनाही रायपूरमध्ये मैदानाबाहेर पडावे लागले होते.

संघ -भारत : के. एल. राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीशकुमार रे•ाr, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, ध्रुव जुरेल.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रीट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, ऊबिन हर्मन, केशव महाराज, मार्को जॅनसेन, एडन मार्करम, लुंगी एनगिडी, रायन रिकल्टन, प्रेनिलन सुब्रयन.

सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.

Advertisement
Tags :

.