महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एस. टी. बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

05:07 PM Dec 03, 2024 IST | Radhika Patil
Youth dies in S. T. bus collision
Advertisement

वाठार किरोली : 

Advertisement

वाठार येथे रविवारी आठवडा बाजारासाठी आलेल्या युवकाला एस. टी. बसने पाठीमागून धडक दिल्याने प्रताप मानसिंग घोलप (वय वर्षे 39) याचा मृत्यू झाला.

Advertisement

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वाठार येथे घोलपवाडी (ता. कराड) येथील वैभव घोलप, राजेंद्र घोलप आणि प्रताप घोलप हे तिघे जण बाजार करण्यासाठी आले असताना ते रस्त्याकडेला उभे होते. त्यावेळी प्रताप हा त्याचे पॅशन गाडी क्रमांक श्प्-02-R- 216 घेऊन उभा होता. तेव्हा वाठारवरून रहिमतपूरकडे निघालेल्या एस. टी. बसने पाठीमागून धडक दिल्याने प्रताप मानसिंग घोलप याच्या डोक्यावरून एस.टी. चे चाक जाऊन अपघात झाला.

यामध्ये मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून ते मयत झाल्याचे सांगितले. त्याची मृत्यूची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यानुसार एस टी चालक समीर याकूब शेख (रा. एकसळ) हा बस निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालवून प्रताप घोलप यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याची तक्रार मयताचा चुलत भाऊ योगेश घोलप याने रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे, पीएसआय जाधव आणि बीट अंमलदार घाडगे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

व्यापाऱ्यांना रस्त्यावर न बसण्याच्या सूचना

वाठार येथे रविवारी मोठा आठवडा बाजार भरत असतो. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात जमत असतात. तसेच कारखाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. त्यासाठी लगेचच माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील, वाठार सोसायटीचे संचालक तानाजी पाटील, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विकास गायकवाड, सरपंच सुनिल कांबळे, युवा नेते चंद्रकांत गायकवाड यांनी घटना झाल्यानंतर लगेचच बाजारात रस्त्याकडेला बसलेल्या व्याप्रायांना रस्त्यावर न बसता नाल्याच्या पाठीमागे बसण्याच्या सूचना केल्या. वाहतुकीस कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल असे यावेळी सर्व पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article