For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

45 जिवंत काडतुसांसह दिल्लीत तरुणाला अटक

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
45 जिवंत काडतुसांसह दिल्लीत तरुणाला अटक
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिनापूर्वी एका कारस्वाराला 45 जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. एहित शाम-अल (22) असे या तऊणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो उत्तर प्रदेशातील पिलीभीतचा रहिवासी आहे. नवी दिल्ली पोलीस त्याची चौकशी करण्यात व्यग्र आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे कोठून मिळाली आणि रात्रीच्या वेळी तो कोठे जात होता यासंबंधी सखोल माहिती त्याच्याकडून घेतली जात आहे. त्याच्याकडे उत्तर प्रदेशमधील परवाना असला तरी दिल्लीत काडतुसे आणण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे काडतुसे घेऊन तो दिल्लीत काय करण्यासाठी आला होता, याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांचे पथक रात्री उशिरापर्यंत गस्त घालत असताना काडतुसांसह तरुण सुरक्षा दलाच्या जाळ्यात सापडला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास उत्तर प्रदेश परवान्याची स्कॉर्पिओ कार येताना दिसल्यानंतर पोलिसांनी संशयावरून कार थांबवून तपासणी केली असता चालकाजवळ एक लहान पाकिट आढळून आले. पाकीट उघडल्यावर 45 जिवंत काडतुसेही सापडली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.