For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तेजस एमके-1 ए’ ऑक्टोबरमध्ये वायुदलाला मिळणार

06:49 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘तेजस एमके 1 ए’ ऑक्टोबरमध्ये वायुदलाला मिळणार
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) भारतीय वायुदलाला त्याचे पहिले लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस एमके-1 ए ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत देणार आहे. या स्वदेशी लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण मार्चमध्ये झाले आहे. तेव्हापासून आतापर्यंत याचे इंटीग्रेशन ट्रायल्स सुरू आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या उपकरणांसाब्sात तसेच शस्त्रास्त्रs जोडून याचे परीक्षण सुरू आहे.

वायुदलाने 83 तेजस एमके-1ए ची ऑर्डर एचएएलला दिली होती. याकरता 48 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तेजसचा समावेश झाल्याने वायुदलाच्या जुन्या मिग सीरिजच्या विमानांना हटविण्यात येणार आहे. नव्या तेजससोबत राजस्थानच्या जोधपूरमध्ये तिसरी स्क्वाड्रन तयार केली जाणार आहे. हे लढाऊ विमान जगातील सर्वोत्कृष्ट हलके लढाऊ विमान आहे.

Advertisement

तेजस एमके-1ए लढाऊ विमानात डिजिटल फ्लाय बाय वायर फ्लाइट कंट्रोल कॉम्प्युटर (डीएफसीसी) लावण्यात आला आहे. ही यंत्रणा विमानाला उड्डाणावेळी वैमानिकानुसार संतुलित ठेवत असते.  या सिस्टीममुळे  रडार, एलिवेटर, फ्लॅप्स आणि इंजिनचे नियंत्रण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार आहे. फ्लाय बाय वायर लढाऊ विमानाला स्टेबलाइज करते, हे विमानाला सुरक्षितता प्रदान करते.

विमानाच्या अत्याधुनिक आवृत्तीत स्मार्ट मल्टी फंक्शन डिस्प्ले, अॅडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे रडार, अॅडव्हान्स्ड सेल्फ प्रोटेक्शन जॅमर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट इत्यादी सुविधा आहेत. मार्क-1 हे मागील वेरिएंटपेक्षा काहीसे कमी वजनाचे ओ. परंतु आकारात हे त्याच्याइतकेच आहे. 43.4 फूट लांबी, 14.5 फूट उंची असणारे हे विमान कमाल 2200 किमी प्रतितासाच्या वेगाने उ•ाण करू शकते. याची कॉम्बॅट रेंज 739 किलोमीटर इतकी आहे. हे विमान कमाल 50 हजार फुटांच्या उंचीपर्यंत जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.