Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड, तरुणास अटक
कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड; पोलिसांच्या तत्परतेने आरोपी जेरबंद
कोल्हापूर : भरवस्तीमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढून पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणावर जुना राजबाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने दिली असून, यानुसार अरबाज फय्याज बागवान (वय २८ रा. रेडेकर गल्ली, लक्षतीर्थ बसाहत) याला अटक केली. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
सोमवारी दुपारी शहरातील उपनगरामध्ये एक अल्पवयीन तरुणर्णी बलाससाठी निघाली होती. यावेळी अरबाज बागवान दुचाकीवरुन तिचा पाठलाग करत आला. रस्त्यामध्ये तिला थांबवून तु माझ्याबरोबर दुचाकीवरुन चल अशी गळ घालू लागला. पीडित तरुणीने दुचाकीवर बसण्यास नकार देत पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्यचे सांगितले. तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेची माहिती संबंधीत तरुणीने आईला दिली. यानंतर मंगळवारी सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी अरबाजला अटक करण्यात आली.