कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युवकांना, महिलांना सहकारक्षेत्रात प्रोत्साहन द्यावे

01:22 PM Nov 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन, पेडणे येथे सहकार भारतीचे आठवे अधिवेशन उत्साहात

Advertisement

पेडणे : नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत आणि विकसित गोवा 2037 स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी सहकार भारतीने सहकाराच्या माध्यमातून प्रयत्न करावे. त्यासाठी गोव्याच्या सहकार क्षेत्रात युवक आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश करावा, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले पेडणे येथे आयोजित केलेल्या सहकार भारती गोवाचे आठव्या अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार  सदानंद शेट तानावडे, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, पेडणे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अश्विनी पालयेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीप पाटील, सहकार भारती गोवाचे अध्यक्ष अशोक गावडे, सचिव रघुवीर वस्त, अधिवेशन प्रमुख श्रीपाद परब आदीसह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Advertisement

सहकार क्षेत्रात असलेल्या पळवाटा बंद करून सहकाराला नवी दिशा देण्यासाठी सहकार भारतीने पुढाकार घ्यायला हवा. गोव्याच्या सहकाराचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. गोव्यात सहकाराला भरपूर वाव आहे मात्र त्यासाठी संघटित कार्यकर्त्यांची गरज आहे. सरकारचे आवश्यक सहकार्य त्याची मिळेल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. सन्माननीय अतिथी म्हणून बोलताना राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले, गोव्यातील सहकार कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून सहकार क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी सज्ज व्हायला हवे. गोव्यासारख्या छोट्या राज्यात सहकार क्षेत्राच्या जोरावर अपेक्षित बदल घडवून आणणे शक्मय असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोव्याच्या सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सुभाष हळर्णकर, महेश आमोणकर, वल्लभ साळकर, डॉ. दत्ताराम देसाई, छाया पै खोत, विठ्ठल साजी वेर्णेकर, श्रीपाद परब इत्यादींचा समावेश होता. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सर्वप्रथम सहकाराचा सहकार ध्वज फडकवला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन केले. ‘सहकार स्पंदन 2025’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. भगवती हायस्कूल पेडणेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. महेश आमोणकर यांनी सहकार मंत्र म्हटला तर सरिता बोरकर यांनी सहकार गीत सादर केले. श्रीपाद परब यांनी स्वागत पर भाषण केले तर सहकार भारतीचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी प्रास्ताविक केले. अशोक गावडे वासुदेव परब यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. श्रीपाद परब यांनी मान्यवरांना स्मृतीचिन्हे प्रदान केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सालेलकर यांनी केले. वासुदेव परब यांनी आभार मानले.

समर्पित भावनेने कार्य करणारे कार्यकर्ते हवेत : पाटील

सहकार हा देशाचा आत्मा आहे. सहकाराच्या माध्यमातून देशाची सर्वांगीण प्रगती शक्मय आहे. त्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे संस्कारी कार्यकर्ते सहकार क्षेत्रात तयार झाले पाहिजे. त्यासाठी देशभरात प्रयत्नशील असलेल्या सहकार भारतीचे जाळे गावागावात पसरण्याची गरज आहे. सहकार भारतीचे कार्य आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सहकाराचा विचार राजकारण विरहित असावा, असेही ते म्हणाले. सहकार क्षेत्रातूनच ग्राम विकास शक्मय आहे. म्हणूनच केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू केल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article