महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धर्मसंस्काराच्या कार्यात तरुण पिढी

11:56 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सातव्या दिवशी दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद : भर पावसातही तरुणांमधील उत्साह टिकून : उद्या व्याख्यानाचे आयोजन

Advertisement

बेळगाव : एकीकडे वाढती व्यसनाधिनता व गैरमार्गाकडे तरुणाई वळत असताना दुसरीकडे भिडे गुरुजींच्या विचारांतून धर्मसंस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी दुर्गामाता दौड काढली जात आहे. स्फूर्तिदायी दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणाईची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी पावसाचा जोर असतानाही तरुणाई मात्र धर्मसंस्काराच्या कार्यासाठी हजारोंच्या संख्येने दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाली होती. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दौडच्या सातव्या दिवसाची सुरुवात नेहरूनगर येथील बसवाण्णा मंदिरापासून झाली. पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी व जे. एम. कालीमिर्ची यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर बसवाण्णा मंदिरात आरती होऊन प्रेरणामंत्राने दौडची सुरुवात झाली. भर पावसातही तरुणांमधील उत्साह टिकून होता.

Advertisement

ठिकठिकाणी दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. उभारण्यात आलेल्या कमानी, शिवरायांचे चरित्र दाखविणारे देखावे यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. सदाशिवनगर, नेहरूनगर, गँगवाडी या ठिकाणी दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. औक्षण करण्यासाठी महिला जागोजागी उभ्या होत्या. शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात दौडची सांगता झाली. अॅड. अमर यळ्ळूरकर व मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. शुक्रवारी होणाऱ्या दौडमध्ये पुणे येथील शिवव्याख्याते सौरभ करडे व थोरले शाहू महाराज यांचे वंशज रघुनाथ दौलतराव डुबल-इनामदार उपस्थित राहणार आहेत.

शाहू महाराज वंशजांची उपस्थिती

सदाशिवगड येथील थोरले शाहू महाराज यांचे साडू सरदार बाळोजी डुबल-इनामदार यांचे वंशज रघुनाथ दौलतराव डुबल-इनामदार उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या वंशजांना आमंत्रण दिले जाते. यावर्षी रघुनाथ इनामदारांना आमंत्रण देण्यात आले असून ते शुक्रवार दि. 11 रोजी होणाऱ्या दौडमध्ये सहभागी होणार आहेत.

सौरभ करडे यांचा अल्पपरिचय

पुणे येथील सौरभ करडे हे शिवचरित्राचे व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘हिंदवी स्वराज्याचे शिलेदार’, ‘असे होते शिवराय’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘राव...बेदरकार वादळाची कथा’ यासह इतर पुस्तकांचे लेखन केले आहे. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटासाठी इतिहास सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.त्याचबरोबर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

उद्याचा दौडचा मार्ग

शुक्रवार दि. 11 रोजी ताशिलदार गल्ली सोमनाथ मंदिरापासून दौडला प्रारंभ होईल. फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मुजावर गल्ली, कांगली गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, महाद्वार रोड, तानाजी गल्ली, समर्थनगर, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर ओव्हरब्रिजमार्गे शनिमंदिर येथे सांगता होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article