कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीत तरुणीची गळफासाने आत्महत्या

04:01 PM Nov 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरातील झिरंग रोड येथील कादंबरी प्रशांत वंजारी (३४) हिने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बुधवारी मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास तिने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यावेळी ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. दीड वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. तिच्यावर मानसोपचार सुरु होते. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात हलविला आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक खंदरकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, हवालदार मनोज राऊत, अनिल धुरी यांनी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक माधुरी मुळीक करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
Young woman commits suicide by hanging in Sawantwadi#tarun bharat sindhudurg # news update# konkan update# suicide
Next Article