प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाच्या घराची तोडफोड
कोल्हापूर :
कांचनवाडी (ता. करवीर) येथील एका तरुणाने काही दिवसांपूर्वी गावातील एका तरुणीबरोबर प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाच्या रागातून संबंधीत तरुणीच्या नातेवाईकांनी नवविवाहित तरुणाच्या घरावर आणि दुकान व फोटो स्टुडिओवर हल्ला करुन, घर, दुकान, स्टुडिओची मोडतोड केली. तसेच नवविवाहित तरुणाच्या वडीलांना आणि भावाला लोखंडी रॉड, गज आणि काठीने बेदम मारहाण करुन जखमी केले. बाबूराव जोती गुरव, त्यांचा मुलगा दिपक बाबूराव गुरव (रा. कांचनवाडी) अशी त्याची नावे आहेत. या गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात नववधूच्या 18 जणांविरोधी गुन्हा दाखल झाला असून सहा जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये पंकज भोसले, अक्षय भोसले, संभाजी भोसले, मोहन भोसले, ईश्वरा भोसले, विनायक भोसले यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कांचनवाडीतील बाबूराव गुरव यांच्या मोठ्या मुलग्याने गावातील तऊणीबरोबर प्रेमविवाह केला. हा प्रेमविवाह तऊणीच्या घरच्यांना मान्य नव्हता. त्यामुळे तिच्या घरच्यासह नातेवाईक बाबूराव गुरव आणि त्याच्या मुलग्याविरोधी चिडून होते. त्यातून संबंधीत नववधूच्या सुमारे 18 नातेवाईकांनी हातात लोखंडी रॉड, गज आणि काठी घेवून, गुरव यांच्या राहत्या घरावर, दुकानावर आणि फोटो स्टुडिओ हल्ला करीत, घरातील प्रांपचिक साहित्यासह दुकानातील आणि फोटो स्टुडिओ मधील साहित्याची मोडतोड केली. तसेच बाबूराव गुरव आणि त्याचा मुलगा दिपक बाबूराव गुरव हे दोघे पितापुत्र गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी करवीरत पोलीस ठाण्यात बालाजी भोसले, पंकज भोसले, शंभुराज भोसले, अक्षय भोसले, संभाजी भोसले, मोहन भोसले, राज भोसले, ईश्वरा भोसले, शंकरा भोसले, संदिप भोसले, मयुर भोसले, विष्णूपंत भोसले, धीरज भोसले, सरदार भोसले, रणजीत भोसले, राजवर्धन भोसले, धनाजी भोसले, विनायक भोसले (सर्व रा. कांचनवाडी, ता. करवीर) या अठरा जणाविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.